अमरावती - जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण 20 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 368 वर पोहोचली आहे. 20 पैकी 10 रुग्ण हे बडनेरा परिसरात आढळले आहेत.
बडनेरा येथील जुनी आणि नवी वस्ती मिळून एकूण 10 कोरोना रुग्ण आढळले आहे. यापैकी 7 पुरुष आहेत, तर तीन महिला आहेत. अमरावतीच्या साईनगर परिसरात 56 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. व्याघ्र प्रकल्प कार्यालय आवारात असणाऱ्या वन विभाग कर्मचारी वसाहतीत आज पुनः 18 वर्षीय युवतीला कोरोना असल्याचे समोर आले. या ठिकाणी आतापर्यंत तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.