महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 89 वर; परतवाड्यासह चार नव्या भागत आढळले रुग्ण - अमरावती कोरोना अपडेट

परतवाडा येथील 49 वर्षीय व्यक्ती नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असून त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीचा अहवाल प्राप्त होताच परतवाडा शहरात भीतीचे सावट पसरले. नांदगाव पेठ परिसरातील 60 वर्षीय महिलाही कोरोनाबाधित निघाली आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : May 13, 2020, 11:02 PM IST

अमरावती- जिल्ह्यातून कोरोना संपुष्टात येत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, बुधवारी रात्री परतवाडा शहरासह चार नव्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री कोरोना चाचणी अहवाल समोर आला. परतवाडा येथील 49 वर्षीय व्यक्ती नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असून त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीचा अहवाल प्राप्त होताच परतवाडा शहरात भीतीचे सावट पसरले. नांदगाव पेठ परिसरातील 60 वर्षीय महिलाही कोरोनाबाधित निघाली आहे. खोकला, ताप असल्याने त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्या महिलेला कोरोना असल्याचे स्पष्ट होताच तिच्या संपर्कात आलेल्यांचा स्वॅब घेतला जात आहे.

अमरावती

अमरावती शहरातील अंबिकानगर परिसरात 43 वर्ष वयाच्या पुरुषाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेलपुरा भागातील 30 वर्षाच्या पुरुषालाही कोरोना झाला आहे. लालखडी परिसरात राहणाऱ्या 65 वर्षाच्या व्यक्तीलाही कोरोना झाला असून अमरावतीतून कोरोना संपुष्ट येत असल्यासारखे वाटत असताना, आता कोरोना अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली. सोमवारपासून रस्त्यावर नेहेमीसारखी गर्दी उसळली आहे. अनेक दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू झाली असताना आता अगदी नव्या भगात कोरोना पसरत असल्याचे आजच्या अहवालाद्वारे लक्षात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details