अमरावती - महिलांचा अनादर करणे ही भाजपची संस्कृती आहे, अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. निधी हवा असेल तर मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा परतूरला करायचा का? असा प्रश्न विचारत, त्या मोर्चासाठी तुम्ही सांगाल तर एखाद्या अभिनेत्रीलाही आपण बोलावू आणि नाहीच भेटले तर तहसीलदार बाई 'हिरोईन' आहेत, असे म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले होते. या वक्तव्याचा मंत्री ठाकूर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या, महिलांचा अनादर करणे भाजपची संस्कृती आहे. हे लोक मनुस्मृतीचे पूजक आहे. वेळोवेळी भाजपच्या मंडळीनी महिलांना खालच्या स्तरावर बोलण्याच काम केले आहे. मी महिला असल्याने मला देखील ट्रोल केले आहे, असेही त्यांनी सांगितले.