महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवसा तालुक्यातील क्रीडा संकुल बांधून पूर्ण; लवकरच लोकार्पण - अमरावती बातमी

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार तालुकास्तरीय क्रीडा संकुलची निर्मिती करण्यात आली आहे.  व्यायाम, स्विमिंग, खेळ, बॅडमिंटन, हॉलीबॉलसह अन्य सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतूने सुरवाडी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे.

तिवसा तालुक्यातील क्रीडा संकुल बांधून पूर्ण , लवकरच लोकार्पण

By

Published : Aug 23, 2019, 11:58 AM IST

अमरावती -अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सुरवाडी खुर्द येथे निर्मित करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण लवकरच होणार आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून हे साकार झाले आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला ही लाजवेल असे तालुका क्रीडा संकुल तिवसा सारख्या ग्रामीण भागात तयार झाले आहे.

तिवसा तालुक्यातील क्रीडा संकुल बांधून पूर्ण, लवकरच लोकार्पण

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार तालुकास्तरीय क्रीडा संकुलची निर्मिती करण्यात आली आहे. व्यायाम, स्विमिंग, खेळ, बॅडमिंटन, हॉलीबॉलसह अन्य सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतूने सुरवाडी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. या क्रीडा संकुलामुळे उत्तम खेळाडू तयार होण्यास मदत होईल. क्रीडा संकुलाचे लोकार्पण लवकरच होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details