अमरावती -विदर्भातील काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार आणि पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी दुचाकीवरून मतदार संघात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला.
आमदार यशोमती ठाकूर यांचा दुचाकीवरून मतदार संघात फेरफटका - आमदार यशोमती ठाकूर यांचा मतदार संघात फेरफटका
आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील शिवणगाव, फत्तेपूर येथे विकास कामांच्या भूमीजनासाठी दुचाकीवरून हा दौरा केला.
आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील शिवणगाव, फत्तेपूर येथे विकास कामांच्या भूमीजनासाठी दुचाकीवरून हा दौरा केला. आता निवडणुकीचे वारे वाहायला लागले असून मतदारांशी संवाद साधण्यासाठी आमदार ठाकूर या दुचाकीने लोकांपर्यंत पोहोचून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपला नेता दुचाकीवरून गावात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या दुचाकी काढल्या.
यापूर्वी अनेकदा आमदार यशोमती ठाकूर दुचाकीने मतदार संघात फिरल्या आहेत. दुचाकीने प्रवास केल्याने लोकांशी थेट बोलता येते. आजूबाजूचे वातावरण कळते, समस्या पटकन लक्षात येतात. यामुळे त्यांचे निवारण करणे सोपे जाते, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.