अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माडीझाडाप गावाजवळील जंगलात या वाघाचा अचानक मृत्यू झाला आहे. वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी सुद्धा मध्यप्रदेशच्या सीमेवर एक वाघ संशयास्पद रित्या मृताअवस्थेत आढळल्याने खळबळ माजली होती.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू - latest news of tigre died
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
20 तारखेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या माडीझाडाप गावाच्या बिटच्या कंपार्टमेंटमध्ये कर्मचारी काम करताना त्यांना या वाघाचा मृतदेह आढळला आहे. मृत्यू झालेल्या वाघावर कुठल्याही प्रकारच्या जखम दिसून येत नाही तसेच शरीराबाहेर विद्युत रेशा ही दिसली नाही तसेच दूषित पाण्यामूळे वाघाचा मृत्यू झालेला असू शकतो का याचा तपासही वनविभागाने केला आहे. दरम्यान वाघाच्या मृत्युनंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा -Serum Institute Fire : 'सीरम'च्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू; कोव्हिशिल्ड लस सुरक्षित