अमरावती-मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागात येणाऱ्या चौराकुंड परीक्षेत्रात घनदाट वाघाचा बछडा आणि रानडुक्कर मृतावस्थेत आढळले आहेत. जंगलात गस्तीवर असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना शनिवारी हे निदर्शनास आले. वाघाच्या बछड्यापासून काही अंतरावर आढळलेल्या रानडुक्कराची वाघिणीने शिकार केली असल्याचा अंदाच वर्तवण्यात आला आहे.
मेळघाटात वाघाच्या बछड्यासह रानडुक्कर आढळले मृतावस्थेत - wild boar found dead
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना रानडुक्कर आणि वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आले. रानडुक्कराने वाघाच्या बछड्यावर हल्ला केला असावा आणि त्यानंतर वाघिणीने रान डुक्करावर हल्ला करुन त्यास ठार मारले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
वन कर्मचारी जंगलात नियमित गस्तीवर असताना हा थरकाप उडविणारा प्रकार लक्षात आला. हा प्रकार शिकारीचा आहे का याचा शोध घेण्यास अकोट येथून प्रशिक्षित कुत्र्यांना जंगलात आणण्यात आले. घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर एक वर्ष वयाच्या वाघाच्या बछड्याचा डोके आणि पाय आढळून आलेत. त्याचे मागचे शरीर एखाद्या प्राण्याने खाल्ले असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.त्याच्या मानेवर दातांचे निशाणही आढळलेत. लगतच्या भागात मोठ्या वाघिणीच्या पंजाचे ठसेही आढळलेत.
रानडुक्कराने वाघाच्या बछड्यावर हल्ला केला असावा आणि त्यानंतर वाघिणीने रान डुक्करावर हल्ला करुन त्यास ठार मारले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. वाघाच्या बछड्याच्या तिन्ही पंजाची नखे तसेच त्याच्या जबड्यातील सर्व दात सुरक्षित आल्याचे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाजही पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोमवारी पुढील कारवाई केली जाणार आहे.