अमरावती - जिल्ह्यातील धारणी तालुक्यापासून २८ किमी अंतरावर केकदाखेडा गाव आहे. या गावात १०-१२ घरे असून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर वाघाने हल्ला चढविल्याची घटना घडली. बारकी राजु डवाल (वय १२ वर्षे), असे या मुलीचे नाव आहे.
अमरावतीत मुलीवर वाघाचा हल्ला; धारणीतील केकदाखेड्याची घटना - swapnil umap
मंगळवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या केकदाखेडा या गावात एका बारा वर्षीय चिमुकलीवर हल्ला चढविला. हल्ल्यातून चिमुकली बचावली असून उपचार सुरू आहे.
अचाणकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविल्याची ही बातमी पसरताच संपूर्ण धारणी तालुक्यात एकच खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केकदाखेडा गावाभोवती घनदाट जंगल आहे. जवळच पूनर्वसित डोलार जंगल आहे. २३ जूनला डोलार जंगलात नागपूर येथील वाघ वनविभागाने सोडला असून तोच वाघ आता गावात दहशत निर्माण करत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
बारकिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले आहे. संबंधित वनविभाग वाघाच्या शोधात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. सोबतच गावांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.