अमरावती- राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे तीन ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एक चालक जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. तिन्ही ट्रक एका पाठोपाठ अकोलाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
आज पहाटे अमरावती येथून ट्रक क्र. (एम. एच. २७ बी.एक्स ७३७३) हा सोयाबीन घेऊन अकोला जिल्ह्यातील बाळापूरकडे निघाला होता. प्रवासादर्म्यान अचानक ट्रकची चेसीस तुटली व तो मधेच अडकला. ट्रक मधातच थांबल्याने त्याच्या मागून देशी दारू वाहून नेणारा ट्रक त्यावर आदळला. त्याचाच पाठोपाठ शासकीय डाक वाहून नेणारा ट्रक देखील दारू वाहून नेणाऱ्या ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात डाक वाहून नेणाऱ्या ट्रकचे चालक शपरूजी अंतरुजी नेवाडे (वय. ४८, रा.नागपूर) हे घटनास्थळीच ठार झाले.