महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीतील पेढी नदीत तिघे बुडाले, शोधमोहीम सुरू - three people drowned news

रविवारी रात्री अमरावती शहरासह लगतच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पाऊस सुरू असताना पेढी नदी ओसंडून वाहायला लागली. यावेळी आमला गावातील पद्माकर गोवर्धन वानखडे (50), सतीश अण्णाजी भुजाडे(46) आणि अंकुश सुरेश सगणे (28 ) हे तिघे अचानक नदीतच्या प्रवाहात सापडले आणि पाण्यात बुडाले.

three people drowned in amravati pedhi
three people drowned in amravati pedhi

By

Published : Aug 3, 2020, 11:54 AM IST

अमरावती- रविवारी रात्री मुसळधार पाऊस बरसत होता. यावेळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेढी नदीच्या काठावर वसलेल्या आमला गावातील तीन व्यक्ती नदीत बुडल्याने गावात खळबळ उडाली. गोवर्धन वानखडे (50), सतीश अण्णाजी भुजाडे(46) आणि अंकुश सुरेश सगणे (28 ) अशी त्यांची नावे आहेत.

रविवारी रात्री अमरावती शहरासह लगतच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पाऊस सुरू असताना पेढी नदी ओसंडून वाहायला लागली. यावेळी आमला गावातील पद्माकर गोवर्धन वानखडे (50), सतीश अण्णाजी भुजाडे(46) आणि अंकुश सुरेश सगणे (28 ) हे तिघे अचानक नदीतच्या प्रवाहात सापडले आणि पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येत नदी काठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलीस आणि जिल्हा आपत्ती नियोजनाचे बचाव पथक घटनास्थळी पोचले आणि त्यांनी नदीत उतरून नदीत बुडालेला तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री अंधारात शोध मोहीम थांबविल्यावर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बचाव पथक नदीच्या पात्रात उतरले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख रामेकर यांच्या नेतृत्वात हेमंत सरकटे योगेश घाडगे, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोळस, संदीप पाटील, उदय मोरे, राजेंद्र शाहाकार, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, वाहिद शेख अयुब खान हे बचाव पथकातील सदस्य नदीत बुडालेल्या तिघांचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details