अमरावती -राज्यात कोरोनाने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अमरावती शहरात तीन व्यक्तींच्या कोरोनाचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे अमरावती शहर आणि जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. अमरावतीत यापूर्वी कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी एका कोरोना संशयित मृत व्यक्तीचा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
अमरावतीत आणखी तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह - अमरावती कोरोना रुग्ण
अमरावती शहरात तीन व्यक्तींच्या कोरोनाचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे अमरावती शहर आणि जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. अमरावतीत यापूर्वी कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.
अमरावती कोरोना न्यूज
2 एप्रिलला अमरावतीच्या हातीपुरा परिसरातील व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे 4 एप्रिलला स्पष्ट झाले. या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या 24 जणांना क्वारेन्टाईन करण्यात आले होते. त्यापैकी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या तीन कोरोनाबाधितांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.