अमरावती - राज्य राखीव पोलीस दल वसाहत मार्गावर असलेल्या दागिन्यांच्या दोन दुकानांसह राहुल नगर येथील दागिन्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. गरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हा कारनामा केला आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरामुळे कॅम्प परिसरात खळबळ उडाली आहे.
अमरावतीत रात्र चोरांची...! दागिन्यांची तीन दुकाने फोडली
राज्य राखीव पोलीस दल वसाहत मार्गावर असलेल्या दागिन्यांच्या दोन दुकानांसह राहुल नगर येथील दागिन्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. गरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हा कारनामा केला आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरामुळे कॅम्प परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी रात्री राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात चोरट्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स आणि गुंबळे ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही दुकानांचे कुलुप आणि शटर तोडल्यावर चोरट्याने शटरच्या आत लोखंडी ग्रीलने दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दार तोडता न आल्याने या दोन्ही दुकानात चोरट्यांचा प्लॅन फसला. महालक्ष्मी ज्वेलरीबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी तोडून टाकला. या दोन्ही दुकानातील चोरीचा डाव फसल्याने चोरट्यांनी राहुलनगर येथील पंकज गुहे यांचे एकवीरा ज्वेलर्स फोडले. यावेळी चोरट्यांनी दुकानातील 350 ग्रॅम सोने आणि 4.5 किलो चांदी आणि रोख 8 हजार रुपये लंपास केले. सोबत या दुकानातील सीसीटीव्हीही चोरट्यांनी पळवला. शनिवारी सकाळी दागिन्यांचे तीन दुकान फोडल्याचे समोर येताच परिसरात खळबळ उडाली. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.