अमरावती - मोर्शी परिसरात मागील काही दिवसापासून दुचाकी मोटरसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. तेेव्हा मोर्शी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बऱ्याच गुन्हेगारांवर बारकाईने पाळत ठेवली होती. त्या आधारे मोर्शी पोलिसांनी तळणी येथील सुधाकर मधुकर गुडदे, आकाश प्रकाश मरकाम, राजेश नानाक्रम भलावी (सर्व राहणार तळणा) यांना मोठ्या शिताफीने अटक केली. तपासादरम्यान सदर आरोपींनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्या आधारे मोर्शी पोलिसांनी १५ मोटरसायकली विविध ठिकाणाहून जप्त केल्या आहेेेत.
पोलिसांनी 3 मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या, १५ मोटारसायकली जप्त - गुन्हेगारी विषयी बातम्या
मोर्शी पोलिसांनी 3 मोटारसायकल चोरांना पकडले असून त्या चोरांकडून 15 मोटारसायकली ही जप्त केल्या आहेत.
सदर मोटरसायकलींची एकूण किंमत ७ लाख २० हजार इतकी आहे. मोटरसायकल वेगवेगळ्या कंपनीचे असून त्यात हिरो होंडा स्प्लेंडर, हिरो होंडा फॅशन प्रो, हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा डिलक्स यांचा समावेश आहे. सर्व गाड्या परतवाडा, वरुड, मोर्शी, शिरखेड, देवळी जिल्हा वर्धा तसेच मध्य प्रदेशातून चोरल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
सदरची कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बालाजी, अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे , उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू मडावी, विनोद कडू, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखडे, विष्णू पवार व प्रवीण मरकाम, पोलीस वाहन चालक अरुण चव्हाण यांनी केली.