अमरावती -जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतातील कामे ठप्प झाली झाली आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील येणाऱ्या विश्रोळी धरणाचे तीन दरवाजे 10 सेंटी मीटरने उघडण्यात आले असून यातून २०.५७ घ.मी.से. ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावतीत विश्रोळी धरणाचे तीन दरवाजे उघडले - अमरावतीत मुसळधार
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पावसामुळे चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, भातकुली, अमरावती तालुक्याला ही जबर फटका बसला आहे. अशातच या पावसामुळे धरणाची पाणी पातळी देखील वाढली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील विक्रोळी धरणाचे 3 दरवाजे आज गुरूवारी उघडण्यात आले आहेत.
अमरावतीत विश्रोळी धरणाचे तीन दरवाजे उघडले