अमरावती -अंगावर वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली. अमरावती-अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णा जवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली.
सोनाली गजानन बोबडे (रा. बोपापूर), शोभा संजय गाठे,(रा. अचलपूर), सैय्यद निजामुद्दीन सैय्यद बदरूद्दीन (रा. अंजनगाव सुर्जी) अशी मृतांची नावे आहेत. दुपारच्या सुमारास पूर्णानगरपासून दोन किमी अंतरावर पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली पाच ते सहाजणांनी आसरा घेतला. अचानक वीज कोसळल्याने दोन महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला.