महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 11, 2020, 5:08 PM IST

Updated : Feb 11, 2020, 5:20 PM IST

ETV Bharat / state

'एटीएम' फोडायला आले अन् 'सीसीटीव्ही कॅमेरे' पळवले; अमरावती जिल्ह्यातील अजब प्रकार

येवदा बस स्थानकाजवळील 'स्टेट बँक ऑफ इंडिया'चे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही चोरत धूम ठोकली.

हेच ते एटीएम
हेच ते एटीएम

अमरावती- दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्थानकासमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम काल (दि.10 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी चक्क एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे पळवले.

चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे एटीएममध्ये गेले. एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला. पण, गॅस कटरने एटीएम मशीन कापले गेले नाही. त्यामुळे अखेर, एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन चोरट्यांनी पळ काढला.

शहराच्या मुख्य मार्गावर हे बसस्थानक आहे. या मार्गावर सतत वाहतूक सुरूच असते. शिवाय, पोलीस ठाणे केवळ हाकेच्या अंतरावरच असतानाही हा प्रकार कोणाच्याही नजरेस कसा पडला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऐन रहदारीच्या ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेवर नागरिक सवाल उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - मध्यप्रदेशातून शेळ्यांची चोरी.. चारचाकीने पळ काढणारे शेळीचोर धारणीत ताब्यात

Last Updated : Feb 11, 2020, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details