महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीत चोरट्यांचा बारवर डल्ला, सोळा हजारांचा ऐवज लंपास - संचारबंदी आणि लॉकडाऊन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान शहरालगत असलेल्या परसोडी रस्त्यावरील सलोनी वाईन बारवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शटरचे कुलूप तोडून विदेशी दारुसह जवळपास १६ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला.

संचारबंदीत चोरट्यांचा बारवर डल्ला
संचारबंदीत चोरट्यांचा बारवर डल्ला

By

Published : Apr 3, 2020, 8:18 AM IST

Updated : Apr 3, 2020, 9:54 AM IST

अमरावती- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान शहरालगत असलेल्या परसोडी रस्त्यावरील सलोनी वाईन बारवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शटरचे कुलूप तोडून विदेशी दारुसह जवळपास १६ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला.

ही चोरीची घटना उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकामुळे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मोहन पाटील सलोनी वाईन बारची पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांना या बारचे कुलूप फुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बारचे संचालक मदन जैस्वाल यांना दिली. मदन जैस्वाल अमरावतीतून त्वरित धामणगाव येथे पोहोचले. अज्ञात चोरट्यांनी ७ हजार ३०० रुपयांच्या विदेशी दारूचे बंफर, नाईनटीच्या शिश्या, ८ हजार ४०० रुपये रोख आणि ३०० रुपये किमतीचा चांदीचा शिक्का चोरला आहे.

संचारबंदीत चोरट्यांचा बारवर डल्ला

घटनास्थळाला परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आणि दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुमार चिंता यांनी भेट दिली. दरम्यान या घटनेची नोंद दत्तापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. दरम्यान, संचारबंदीत बारमध्ये चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Last Updated : Apr 3, 2020, 9:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details