अमरावती - जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. मागील काही महिन्यांपूर्वी येथीलच एका मिल मालकाच्या घरी दरोडा टाकण्याची घटना अजून ताजीच आहे. त्यातच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास परतवाडा येथील गुजरी बाजार व मेन रोड परिसरातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली.
अमरावतीच्या परतवाडा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन दुकाने फोडली - परतवाडा
परतवाडा शहरातील गुजरी बाजार व मेन रोड परिसरातील दुकाने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडली
तीन दुकाने फोडली
शहरातील बैतूल स्टॉपवर स्थित राम किराणा, आयुष किराणा, अमरदीप कापड शोरूम व एका बियर शॉपीवर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. रात्रीच्या सुमारास तीनही दुकाने फोडून त्यातून एकूण दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. सध्या परतवाडा पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास करत आहेत.