महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या प्रोमार्क कंपनीची शिफारस करणाऱ्यांची होणार चौकशी

डॉ. संतोष ठाकरे यांनी विद्यापीठाच्या कार्यप्रणाली बाबत तीव्र रोष व्यक्त केला. कुलगुरूंचे आता केवळ ६ महिने शिल्लक राहिले आहेत. या गंभीर प्रकरणाचा सोक्षमोक्ष कुलगुरूंनी लावला नाही, तर आम्ही त्यांना दुसऱ्या मार्गाने पाहून घेऊ, असा इशारा डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी यावेळी दिला.

अमरावती विद्यापीठ
अमरावती विद्यापीठ

By

Published : Oct 22, 2020, 8:42 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्यासाठी नेमलेली प्रोमार्क कंपनी परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे स्वतः कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी मान्य केले आहे. या बोगस कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस करणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे कुलगुरूंनी सिनेट सदस्यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

सलग पाचव्यांदा परिक्षा रद्द झाल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची बदनामी होत आहे. त्यामुळे, आज डॉ. बी. आर. वाघमारे, डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. संतोष ठाकरे यांच्यासह काही सिनेट सदस्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुखही उपस्थित होते. परीक्षा घेण्यास आपण अपयशी कसे काय ठरलो. प्रोमार्क कंपनीला कुठल्या आधारावर परीक्षेचा कंत्राट देण्यात आला. तसेच, या कंपनीला कंत्राट मिळावा यासाठी शिफारस करणाऱ्यांचा हेतू काय होता, आणि आता विद्यपीठाच्या बदनामीसाठी जबाबदार कोण, असे प्रश्न सिनेट सदस्यांनी कुलगुरूंशी बोलताना उपस्थित केले.

यावेळी कुलगुरूंनी अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिनेट सदस्यांच्या लक्षात आले. स्वतः कुलगुरूंनी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीमुळे नाका तोंडात पाणी जायची वेळ आल्याचे मान्य केले. या कंपनीचे काम आता रद्द करण्यात आले असून कंपनीला एक रुपयाही दिला जाणार नाही, असे कुलगुरू म्हणाले. डॉ.बी.आर. वाघमारे यांनी विद्यापीठाला परीक्षा घेण्यासाठी कुठल्याही कंपनीची गरज नाही. आता चुका आपल्या असताना कोण्या कंपनीकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही, असे कुलगुरूंनी म्हटले.

डॉ. संतोष ठाकरे यांनी विद्यापीठाच्या कार्यप्रणाली बाबत तीव्र रोष व्यक्त केला. कुलगुरूंचे आता केवळ ६ महिने शिल्लक राहिले आहेत. या गंभीर प्रकरणाचा सोक्षमोक्ष कुलगुरूंनी लावला नाही, तर आम्ही त्यांना दुसऱ्या मार्गाने पाहून घेऊ, असा इशारा डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी यावेळी दिला. दरम्यान, मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. परीक्षेत अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित सर्वांवर कारवाई करू, असे कुलगुरूंनी सिनेट सदस्यांना सांगितले. डॉ. रविंद्र मुंदरे, डॉ. सुभाष गावंडे, डॉ. अर्चना बोबडे, दिलीप कडू आदी सिनेट सदस्य यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा-अंबादेवी देवस्थान : अमरावतीत भाविकांना मुख्य प्रवेशद्वारावरूनच दर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details