महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navratri 2022 : अमरावती जिल्ह्यात 'या' गावात घडते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन - कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन

देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक ( one of the three and a half pithas ) असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या ( Mahalakshmi Kolhapur ) प्रतिरूपाचे दर्शन अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात घडते. पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून कनोजादेवी येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला नवरात्रोत्सवात विदर्भातील हजारो भाविक येतात. ( There Is a Replica Of Shri Mahalakshmi Of Kolhapur At Ganoja Devi In Amravati District )

Shri Mahalakshmi
महालक्ष्मीचे दर्शन

By

Published : Sep 20, 2022, 1:58 PM IST

Updated : Sep 20, 2022, 3:03 PM IST

अमरावती - देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक ( one of the three and a half pithas ) असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या प्रतिरूपाचे दर्शन अमरावती ( Darshan of Kolhapur's image of Shri Mahalakshmi at Amaravati ) जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात घडते. पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून कनोजादेवी येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला नवरात्रोत्सवात विदर्भातील हजारो भाविक येतात. ( There Is a Replica Of Shri Mahalakshmi Of Kolhapur At Ganoja Devi In Amravati District )

अमरावती जिल्ह्यात 'या' गावात घडते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन




गणोजात अशी प्रकटली श्री महालक्ष्मी -आजच्या गणोजा देवी गावात पाचशे वर्षांपूर्वी गणू नावाचे भट राहत होते. ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे परमभक्त होते. दरवर्षी नवरात्रीला गणू भट हे न चुकता श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जात असत. वृद्धावस्थेत असताना गणू भट यांनी श्री महालक्ष्मीला मी आता तुझ्या दर्शनासाठी कोल्हापूरला येऊ शकणार नाही असे सांगितले. तेव्हा महालक्ष्मीने मीच तुझ्या गावी येणार आहे तू आता गाव येईपर्यंत मागे वळून पाहायचे नाही असे म्हणत देवी अदृश्य झाली. गणू भट हे गणोजा गावात आल्यावर गावातून वाहणाऱ्या पेढी नदी जवळ येताच त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्या मागे असणारी श्री महालक्ष्मी नदीच्या काठावर अंतरधान पावली अशी आख्यायिका आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महालक्ष्मी आंतरधान पावली असे सांगितले जाते त्याच ठिकाणी काही वर्षांनी उत्खनना दरम्यान काळ्या पाषाणात तेजस्वी मूर्ती सापडली. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरूप असणाऱ्या ह्या मूर्तीची ग्रामस्थांनी मार्गशीष पौर्णिमेला प्राणप्रतिष्ठा केली पुढे ह्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मीला श्री गणेशा देवी असे देखील संबोधले जाते.

अमरावती जिल्ह्यातील गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मी



नवरात्रात विदर्भातील हजारो भाविकांची उसळते गर्दी -गणोजा देवी गावात पिढी नदीच्या काठावर श्री महालक्ष्मीचे पूर्वमुखी मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. या मंदिरात श्री महालक्ष्मी सोबतच महादेवाची पिंड आणि दत्ताचे देखील मंदिर आहे. नवरात्रोत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. परदेशातून देखील काही भाविक दरवर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान गणोजा देवी येथे श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवा दरम्यान तीर्थस्थापना अखंड वीणावादन, शोडशोपचार ,अभिषेक, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात अशी माहिती गणोजा देवी मंदिर संस्थानचे पदाधिकारी मिथिलेश बिजवे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली.

Last Updated : Sep 20, 2022, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details