अमरावती - येथील परतवाडा येथे घरी कोणीच नसल्याची संधी साधून भर दिवसा धाडसी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. चोरट्यांनी घरात असलेला तब्बल पावणे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही की काय असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
परतवाडा येथे भरदिवसा चोरी लंपास केली दागिन्यांसह रोख -
परतवाडा मधील बस स्थानक परिसर ते विदर्भ मिलच्या मुख्य मार्गावरील साई मोटरच्या परिसराला लागून असणाऱ्या घुगे नगर आहे. येथील निलेश राखोंडे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी प्रवेश करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कामानिमित्त गेले होतो बाहेर -
गोरे नगर येथील रहिवासी लक्ष्मी राखोंडे व निलेश राखोंडे हे दोघेही पती-पत्नी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बोरगाव येथे गेले होते. सकाळी साडेअकरा ते दुपारी एकच्या दरम्यान घरी दूध घेऊन आलेल्या व्यक्तीला दार उघडे दिसले. मात्र घरातून प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी ही माहिती दिली तात्काळ राखोडे यांना माहिती देण्यात आली घरी येऊन बघताच आलमारीतील १२५ ग्रॅम सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असल्याचे लक्षात आले आहे. यापूर्वीही परतवाडा मध्ये अशाच प्रकारे चोरीच्या मोठ्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पोलीस काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.