अमरावती -गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या नाट्य स्पर्धेचा पडदा आता उघडला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरवती शाखा आणि महानगर पालिका यांच्यावतीने अमरावती येथील टाऊन हॉल एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात चांदूर रेल्वेच्या पीपल्स कला मंचाच्यावतीने 'लेखकाचा कुत्रा' या दमदार एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.
'लेखकाचा कुत्रा' एकांकिकेचे सादरीकरण
कोरोनामुळे राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आदी मनोरंजनाचे व्यासपीठ सुद्धा लॉकडाऊन झाले होते. परंतु आता शासनाने परवानगी दिल्याने नाट्यगृह सुरू झाले. अमरावती येथील टाऊन हॉल येथे एकांकिका स्पर्धा झाल्या. त्यात चांदूर रेल्वेच्या पीपल्स कला मंचच्या वतीने लेखकाचा कुत्रा ही एकांकिका पार पडली.
'लेखकाचा कुत्रा' एकांकिका अमरावतीत नाट्यगृह उघडलेनाट्य लेखनाकडून मालिका लेखनाकडे वळलेल्या लेखक पैशासाठी आपले नीती मूल्य सोडून कसा लिहायला लागतो आणि त्याला परत रंगभूमीकडे परत आणण्यासाठी त्याच्या शिष्याची धडपड यातील द्वंद्व या एकांकिकेत पाहायला मिळते. एकांकिकेचे लेखन विशाल कदम यांचे असून यात विवेक राऊत, अनुज ठाकरे आणि मंगेश उल्हे यांनी भूमिका साकारल्या. हेही वाचा -विदर्भाचा पारा आणखी घसरणार; २९ तारखेपासून थंडीच्या लाटेचा अंदाज