महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट? मंत्री यशोमती ठाकुरांनी व्यक्त केली शंका

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आता मोठी दक्षता घेण्याची गरज आहे. तसेच जिल्हा यंत्रणेने जागोजागी गावोगावी कंटेन्मेंट झोन केले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानादेखील काही लोक ऐकत नाही याची मला खंत आहे, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आली की काय अशी शंका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

amravati lockdown news
यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री

By

Published : May 11, 2021, 11:03 AM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच आता ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आली की काय अशी शंका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया -

गावोगावी कंटेन्मेंट झोन -

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आता मोठी दक्षता घेण्याची गरज आहे. तसेच जिल्हा यंत्रणेनी जागोजागी गावोगावी कंटेन्मेंट झोन केले आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना देखील काही लोक ऐकत नाही याची मला खंत आहे, असेही त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात कडक लॉकडाऊन -

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज एक हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांमधून रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील 130 गाव सील करण्यात आले होते. त्यानंतर आता दोन दिवसांपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करत आहेत. 15 मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. जीवनाश्यक सेवांची दुकाने सुद्धा बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - कृषी मंत्र्यांनी घेतला खरीप हंगामाचा आढावा; शासनाकडून केले खताचे, बियाण्याचे नियोजन

ABOUT THE AUTHOR

...view details