अमरावती :अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जन्मतारखा देखील दोन आहेत. विशेष म्हणजे आता 6 एप्रिलला हनुमान जयंती असून खासदार नवनीत राणा यांच्या एका टीसीवर त्यांची जन्मतारीख 6 एप्रिल 1985 अशी आहे. तर, त्यांच्या जातीचा उल्लेख शीख असा आहे. हनुमान जयंती, आपला वाढदिवस एकाच दिवशी आला असल्याचे त्या आनंदाने सांगत आहेत.
स्पष्टीकरण द्या : दुसरीकडे त्यांच्या जातीच्या खोट्या प्रमाणपत्रासाठी टीसी लावण्यात आली आहे. त्यावर त्यांची जन्मतारीख 15 एप्रिल 1985 अशी आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर मोची असा त्यांच्या जातीचा उल्लेख आहे. हनुमान जयंतीसोबत जर त्यांनी आपल्या वाढदिवसाचा उदोउदो केला तर, त्यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या अधारे लोकसभा निवडणूक फसवणूक करुन लढवल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सुनिल खराटे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे खरे जात प्रमाणपत्र कोणते? तसेच जन्म तारखे स्पष्टीकरण द्याला, हवे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
नवनीत राणा हिंदू शेरनी कशा? :आम्हाला कोणत्याही जाती धर्माचा अपमान करायचा नाही. मात्र, सदैव हिंदुत्वासाठी उभे ठाकणारे आमचे नेते उद्धव ठाकरे यांचा खासदार नवनीत राणा यांनी भाईजान असा उल्लेख करणे योग्य नाही. अमरावती शहरात आतापर्यंत मुस्लिमांच्या सणांमध्ये तसेच त्यांच्या उत्सवात मुस्लिम पेहरावात खासदार नवनीत राणा यांचे पती अनेकदा सहभागी झाले आहेत. मुस्लिमांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचा पेहराव घालण्याची नौटंकी करणे गरजेचे नाही, अशी टीका त्यांनी खासदार राणांवर केली आहे.