अमरावती - रविवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळात अमरावतीत चक्क रस्त्यावर आडवे ठेवलेले बॅरिकेड्स उडाले. या बॅरिकेड्सला पकडण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती शहरातील जवाहर गेट परिसरात कोरोनामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. याठिकाणी चारही बाजूने बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.
वादळात बॅरिकेड्स उडाले, पोलिसांची तारांबळ - अमरावती पोलीस न्यूज
वादळापासून स्वतःचा बचाव करणाऱ्या पोलिसांची बॅरिकेड्स पकडण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली.
वादळात बॅरिकेड्स उडाले, पोलिसांची तारांबळ
दरम्यान, रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे जवाहर गेटसमोरील बॅरिकेड्स हवेच्या दिशेने रस्त्यावर उडायला लागले. यावेळी वादळापासून स्वतःचा बचाव करणाऱ्या पोलिसांची बॅरिकेड्स पकडण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली.