महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sky Walk at Chikhaldara : चिखलदरा येथील ‘स्काय वॉक’ विकासाचा मार्ग मोकळा; केंद्रीय वनविभागाची परवानगी

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली. त्या केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार तत्काळ पाठपुरावा होऊन परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्काय वॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्काय वॉक
स्काय वॉक

By

Published : Jan 23, 2022, 8:31 AM IST

अमरावती - चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. स्काय वॉक विकासाला ( Sky Walk at Chikhaldara ) केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली. त्या केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार तत्काळ पाठपुरावा होऊन परवानगी प्राप्त झाली ( 'Sky Walk' at Chikhaldara Got Permission ) आहे. त्यामुळे स्काय वॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिखलदरा येथील ‘स्काय वॉक’ विकासाचा मार्ग मोकळा

पर्यटनास मिळणार चालना -

जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांतील प्रलंबित बाबी, पर्यावरणविषयक परवानगी आदी प्रक्रिया, विविध पर्यटनस्थळांचा विकास, आवश्यक निधी याबाबत पर्यटन व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. बैठकीला अमरावती येथून अनेक मान्यवर उपस्थित होते. विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे स्काय वॉकचे काम पूर्ण होण्यास आता गती मिळेल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. स्काय वॉक पर्यटकांसाठी एक महत्वाचे आकर्षण केंद्र ठरणार असून, पर्यटकाचा ओघ वाढेल. स्थानिकांमध्ये रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी मिळणे आवश्यक असल्याच्या विषयाबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या बैठकीद्वारे लक्ष वेधले होते. त्यानुसार या कामाबाबत तत्काळ पाठपुरावा करू, अशी सकारात्मकता पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी दर्शवली. त्यानुसार पाठपुरावा गतीने होऊन परवानगी प्राप्त झाली आहे.

आदित्य ठाकरेंचा सकारात्मक पुढाकार -

जिल्ह्यात एक महत्वाची पर्यटन सुविधा याद्वारे निर्माण होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी व पर्यावरणविषयक बाबींसंदर्भातही महत्वपूर्ण चर्चा पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. अमरावती शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांचा विकास व सुशोभीकरण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान तसेच जिल्ह्यातील केकतपूर, शेवती, संगमेश्वर आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार ही कामे लवकरच पूर्णत्वास जातील व अमरावती जिल्ह्यात पर्यटनाबाबत विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - चिखलदऱ्यात साकारला जात आहे जगातील पहिला 'सिंगल रोपवे स्कायवॉक'

सिंगल रोपवेवर तयार होणारा जगातील पहिला स्कायवॉक-

चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेत समुद्रसापटीपासून हजारो मीटरवर वसलेले पर्यटन स्थळ आहे. येथील नागमोडी रस्ते, थंड हवा, रिमझिम पाऊस आणि शेजारीच असलेलला मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामुळे चिखलदऱ्यात पर्यटकांचा ओढा असतो. अशा या चिखलदराच्या पर्यटनात आणखी भर पडणार आहे. कारण येथे एका भल्या मोठ्या काचेचा लांबलचक स्कायवॉक तयार होत आहे. सिडकोच्या माध्यमातून साकारला जाणार हा स्कायवॉक जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आहे. तर भारतातील पहिला मात्र, अशा पद्धतीने 'सिंगल रोपवेवर तयार होणारा जगातील पहिला स्कायवॉक असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे. संपूर्ण जगातील पर्यटक हे भविष्यात चिखलदऱ्यात दाखल होणार आहे. त्याच कारण म्हणजे येथे जगातील आणि देशातील पहिला सिंगल रोपवे स्कायवॉक तयार होत आहे. या स्कायवॉकमुळे विदर्भाचे काश्मीर असलेले चिखलदरा आता सातासमुद्रापार जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details