अमरावती - सोयाबीन काढण्याच्या हंगामात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत.
अमरावती: सोयाबीनची आवक घटल्याने भाव वाढ - अमरावती सोयाबीनची आवक घटली
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सोयाबीनच्या हंगामात सरासरी 40 ते 45 हजार पोत्यांची आवक होते. यावर्षी मात्र हा आकडा 10 हजारांवर आला आहे. बाजारपेठेतील आवक घटल्याने सोयाबीनच्या दरात शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ झाली आहे.
सोयाबीनचे दर वाढले
हेही वाचा - अमरावती: निंबोली येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सोयाबीनच्या हंगामात सरासरी 40 ते 45 हजार पोत्यांची आवक होते. यावर्षी मात्र हा आकडा दहा हजारांवर आला आहे. बाजारपेठेतील आवक घटल्याने सोयाबीनच्या दरात शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ झाली आहे. अमरावतीत सध्या सोयाबीनचे कमाल दर 3 हजार सहाशे 75 तर किमान दर 2 हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत.