अमरावती -अपघात झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णाने रुग्णालयाच्या आवारात असणारी रुग्णवाहिका घेऊन पळाल्याची घटना घडली. अपघात झाल्यामुळे त्याच्यावर काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याने अचानक रुग्णवाहिकेतून पळ काढल्याने चांगलीच खळबळ उडाली.
...अन् रुग्णवाहिका घेऊन पळाला रुग्ण; जिल्हा सामान्य रुग्णालयात खळबळ - अमरावती लेटेस्ट न्युज
शरद कठाडे, असे या रुग्णाचे नाव आहे. अपघात झाल्यामुळे त्याच्यावर काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या हाताला प्लास्टर लावले होते. आज तो रुग्णालयाबाहेर सहज आला. यावेळी त्याला टाटा सुमो ही रुग्णवाहिका परिसरात उभी दिसली. यावेळी गाडीला चावी देखील लागली असावी. त्यामुळे शरद रुग्णवाहिकेत बसला आणि गाडू सुरू करून भरधाव वेगाने पळ काढला.
शरद कठाडे, असे या रुग्णाचे नाव आहे. अपघात झाल्यामुळे त्याच्यावर काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या हाताला प्लास्टर लावले होते. आज तो रुग्णालयाबाहेर सहज आला. यावेळी त्याला टाटा सुमो ही रुग्णवाहिका परिसरात उभी दिसली. यावेळी गाडीला चावी देखील लागली असावी. त्यामुळे शरद रुग्णवाहिकेत बसला आणि गाडू सुरू करून भरधाव वेगात पळ काढला. सध्या लॉकडाऊनमुळे शहरातील रस्ते मोकळे आहेत. त्यामुळे त्याने बडनेराच्या दिशेने जाताना लागणारे तीन उड्डाणपूल आणि बडनेरा येथील रेल्वे पूल, असा चार पूल ओलांडून अतिशय वेगात बडनेरा नवी वस्ती भागापर्यंत पोहोचला.
सकाळी बडनेरा नवी वस्तीचे नगरसेवक प्रकाश बनसोड हे सफाई कामगारांसोबत स्वच्छतेचे नियोजन आखत असताना त्यांना हाताला प्लास्टर असणारा व्यक्ती भरधाव वेगात रुग्णवाहिका चालवताना दिसला. त्याचक्षणी प्रकाश बनसोड यांनी सफाई कामगारांच्या मदतीने ही रुग्णवाहिका थांबविली. यानंतर चालकांवर संशय आल्याने बनसोड यांनी बडनेरा पोलिसांना माहिती दिली. बडनेरा पोलिसांनी चालक शरद कठाडे याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच संबंधित व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.