अमरावती- येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पश्चिम विदर्भातील धान शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. कारागृह परिसरातील २० एकर पैकी दोन एकर शेतीवर मागील पाच वर्षांपासून कैदी शेती करत आहे. या संदर्भातील ईटीव्ही भारतचा हा विषेश रिपोर्ट पाहूयात..
व्यक्तीच्या हातातून कळत न कळत रागाच्या भरात एखादा मोठा गुन्हा घडतो. मग काळ्या दगडाच्या पाषाणाआड त्याला संपुर्ण आयुष्य काढावे लागत असत. पण त्या बंदी बांधवांच्या अंगी असलेले चांगले गुणही वाखणण्याजोगे असतात. एखाद्याने गुन्हा केला की समाज त्याना वाईट नजरेने बघत असतो पण त्यांच बंदिजनांनी पश्चिम विदर्भातील पहिला धान शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. तो ही अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात.
कारागृहाच्या अंतर्गत येणाऱ्या २० एकर शेती पैकी दोन एकर शेतीवर मागील पाच वर्षांपासून हे बंदी बांधव यशस्वी अशी धान शेती करत आहे. पश्चिम विदर्भात जे कुणाच्या हाताला जमलं नाही बंदीबांधवांनी करून दाखवले आहे. कारागृह म्हटले की गुन्हेगारांचे स्वतंत्र गाव असे चित्र समोर येते. मात्र या गावातही कष्टकरी, श्रमकरी व शेती करण्याचे गुण अंगी असलेले बंदी वास्तव्यास आहे. मध्यवर्ती कारागृहच्या अंतर्गत येणाऱ्या खुल्या कारगृहात ३४ बंदी आहेत. हे सगळे तिथली सर्वच प्रकारचे कामे करतात. त्यांच्या या कामाचा त्यांना मोबदलाही दिला जातो. कोरोनामुळे सध्या १२ बंदी काम करत आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : एम्स,ट्रिपल आयटी आणि आयआयटी जोधपूरच्या संशोधनातून कोविड ट्रॅकरची निर्मिती
विदर्भात धान शेती फक्त भंडारा,गोंदिया,चंद्रपूर याच जिल्ह्यात होते. परन्तु आता बंदीच्या मेहनतीने अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहाच्या जमिनीतही धान पीक मागील पाच वर्षांपासून घेतले जात आहे. यासोबतच इतर पालेभाज्या, गहूसह इतर धान्याचे पीक इथे घेतले जात असल्याने कारागृहातील बंदींना पौष्टिक आहारही मिळत आहे. यासोबतच येथे बैलजोडी, शेळ्या, गाय इत्यादी जनावरे सुद्धा असून शेळी पालनातून लाखो रुपयांचा नफाही कारागृहाला मिळत आहे. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेली धान शेतीची लागवड यावर्षीही करण्यात आली आहे. याबद्दल खुल्या कारागृहातील बंदी संतोष सोंळंके सांगतात, मी रोज सकाळी आत ते साडेआठ वाजत आम्ही खुल्या कारागृहातील शेती मध्ये कामावर येतो, आल्यानंतर पहिल्यांदा शेळीपालन केंद्राला भेट देतो व शेळ्यांची चारा पाण्याची व्यवस्था करून नंतर शेतात लावलेली वांगी, कोहळे आणि लौकीची लागवड केलेल्या भागात जाऊन तिथली कामे करतो. साधारण अकरा ते साडेअकरा या वेळेत जेवण करण्यात येते आणि जेवण झाल्यावर ऐक वाजपर्यंत आरामाची वेळ असते व आराम झाल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात होते त्यानंतर चार वाजता परत कारागृहात जातो. परंतु आता सध्या कोरोना असल्याने सध्या आमची राहण्याची व्यवस्था कारागृहाच्या बाहेर करण्यात आली आहे.