अमरावती - परिस्थितीने हतबल झालेले एक कुटूंब पोटाची भूक भागविण्यासाठी उत्तरप्रदेश राज्यातील कानपूरमधून चार महिन्यापूर्वी हैदराबादमध्ये दाखल झाले होते. तेथे मोलमजुरी करुन कुटूंबाचा गाडा हाकतानाच कोरोनाच्या संकटाचा फटका या कुटूंबाला देखील बसला. कामच नसल्याने संबंधित ठेकेदाराने त्यांना कामावरून काढून टाकले. बिहारमधून नातेवाईकांचे फोन सुरू झाले. अशा परिस्थितीत हे कुटूंब रस्त्यात भेटलेल्या वाहनांनी हैदराबाद ते औरंगाबादपर्यंत पोहचले. दरम्यान, औरंगाबादमधील खाकी वर्दीतील देवदूतांनी या कुटूंबाला भुसावळपर्यंत आणून सोडले आणी नंतर सुरू झाली कुटूंबाची असह्य परवड.
अमरावती : दोन लेकरांसह दाम्पत्याची उन्हात पायपीट, हैदरबादहून कानपूरकडे प्रवास - अमरावती बातमी
टाळेबंदीमुळे अनेक गरीबांचे हाल होत आहेत. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होत आहे. अनेक जण पायी आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. असेच एक उत्तर भारतातील कुटुंब हैदराबाद येथून कानपूर येथे निघाले आहे
रखरखत्या उन्हात दररोज 75 किलोमीटरचे अंतर कापून दोन लेकरांसह दाम्पत्य उपाशीपोटी चार दिवसांपासून 300 किलोमीटर पायपीट सुरू ठेवत हे कुटूंब अमरावती जिल्ह्यात दाखल झाले. चार दिवसांपासून अन्नाचा कण पोटात नव्हता अशा परिस्थितीत अमरावती-नागपूर महामार्गावरून जाणाऱ्या लोकांना जेवू घालणाऱ्या संजीवन फाऊंडेशनचे कार्यकर्ते भेटले त्यांनी या कुटूंबाला जेवायला दिले. त्यानंतर पुन्हा या कुटूंबाचा प्रवास सुरु झाला तो आपल्या उत्तरप्रदेशमधील गावाच्या दिशेने.
हेही वाचा -सातेगाव फाट्यावर ट्रकला अपघात, २५ टन तूरडाळ जळाली