अमरावती:आमच्याच भागातले रुग्ण तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. आमच्याच लोकांमुळे तुम्ही मोठे झाले अशा स्वरूपाची धमकी शहरातील डॉक्टर गोपाल राठी यांना दिली गेली असताना डॉक्टर निशांत नामक एका व्यक्तिने देखील डॉक्टर राठी यांच्या व्हाट्सअप वर नुपूर शर्माला सपोर्ट म्हणजे काय असा सवाल विचारून तुमचा जनसंपर्क प्रमुख आमच्याकडे नेहमीच रुग्णांची माहिती घेण्यासाठी येतो आता यापुढे मात्र तुम्हाला आमच्याकडून रुग्ण मिळणार नाही अशा स्वरूपाचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर झीशान यांच्या अशा म्हणण्यावर डॉक्टर राठी यांच्याकडून त्याला माफी देखील मागण्यात आली आहे. या संपूर्ण संवादाचा व्हाट्सअप वरील स्क्रीन शॉट सध्या अमरावती शहरात व्हायरल होतो आहे.
Threats From The Doctor : नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या डॉक्टरला डॉक्टरकडूनच धमकी - उमेश कोल्हे हत्या प्रकरण
अमरावती शहरात औषधी व्यवसाय उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर (Umesh Kolhe murder case) नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्या अनेकांना धमकी (The doctor who supported Nupur Sharma) मिळाल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे शहरातील एका नामांकित डॉक्टरला एका डॉक्टरकडूनच व्हाट्सअप वर आता तुमच्याकडे रुग्ण पाठवणार नाही तुम्हाला पाहून घेऊ अशा स्वरूपाची धमकी (received threats from the doctor) देण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
डॉक्टरला डॉक्टरकडूनच धमकी
डॉक्टर राठी यांच्यासोबत एका डॉक्टरने केलेल्या संवादाचा व्हाट्सअप स्क्रीनशॉट