महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारने सर्वांना सारखी ट्रीटमेंट दिली पाहिजे- यशोमती ठाकूर - यशोमती ठाकूर

अनेक जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला देखील ब्रेक लागला आहे. अमरावती जिल्ह्यात देखील १०० लसीकरण केंद्र उडले होते. अमरावती जिल्ह्यासाठी नव्याने २० हजार कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने दोन दिवसांसाठी थोडा दिलासा मिळाला आहे. बंद पडलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर

By

Published : Apr 13, 2021, 8:23 PM IST

अमरावती - राज्यात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद झाले आहे. यावर अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने सर्वांना सारखी ट्रीटमेंट दिली पाहिजे, यात मला राजकारण करायचे नाही, केंद्र सरकारने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे. इतर कंपनीला परवानगी दिली पाहिजे. लस महोत्सव साजरा करा, असे म्हणत आहेत. मात्र, अमरावतीत लस उपलब्ध नाही, लस महोत्सवात अमरावतीचे सेंटर बंद आहे. केवळ दोन दिवस पुरेल इतकी लस अमरावतीत उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यशोमती ठाकूर
जिल्ह्याला मिळाले २० हजार डोजराज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला देखील ब्रेक लागला आहे. अमरावती जिल्ह्यात देखील १०० लसीकरण केंद्र उडले होते. अमरावती जिल्ह्यासाठी नव्याने २० हजार कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने दोन दिवसांसाठी थोडा दिलासा मिळाला आहे. बंद पडलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे.हेही वाचा-'गेल्या 70 वर्षांत एवढा बेजबाबदार पंतप्रधान देशानं पाहिला नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details