अमरावती - वर्ध्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका स्विफ्ट गाडी चालकाला पळसखेड मार्गावर पाण्याचा अंदाज न आल्याने, गाडी पाण्यात अडकल्याची घटना घडली. पाण्याचा वेग वाढल्याने, गाडी पाण्यात तरंगायच्या अवस्थेत असतानाच, येथील हॉटेल व्यावसायिक विवेक राऊत यांनी गाडीला धक्का देत पाण्याबाहेर काढले. राऊत यांच्या समयसूचकतेमुळे गाडीतील तिघांवरचा मोठा धोका टळला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी अडकली, एका व्यक्तीच्या मदतीने मोठा धोका टळला
वर्ध्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका स्विफ्ट गाडी चालकाला पळसखेड मार्गावर पाण्याचा अंदाज न आल्याने, गाडी पाण्यात अडकल्याची घटना घडली.
पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाडी पाण्यात अडकली
नुकतीच अशीच एक घटना घडली
नुकतीच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील पळसखेड मार्गावर अशीच एक घटना घडली होती. पुलावरील पाणी वाढल्यामुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने, तवेरा गाडी सरळ नाल्यात कोसळली होती. यामध्ये गाडीतील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटुंबातील ६ लोकांचे प्राण या घटनेत थोडक्यात वाचले.