अमरावती -शहरातून दर्यापूरकडे जात असताना बोराळा फाट्या जवळ रात्री 10 च्या सुमारास अचानक गाडीने पेट घेतला. काही मिनिटातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती-दर्यापूर मार्गावर गाडीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही - अमरावतीमध्ये शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला
शहरातून दर्यापूरकडे जात असताना बोराळा फाट्याजवळ रात्री 10 च्या सुमारास अचानक गाडीने पेट घेतला. काही मिनिटातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोनु कोठारिया हे आपल्या चार चाकी वाहनामधून खोलापूर पेट्रोल पंपावर डिझेल भरून जात होते. यावेळी अचानक गाडीमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात गाडीतून धुर निघाल्याने शॉर्टसर्किट झालं. शॉर्टसर्किटमुळे गाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये काही मिनिटातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दर्यापूर येथील नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
TAGGED:
car caught fire In Amravati