महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्ग सहावर धावत्या बसने घेतला पेट, प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश - amravati accident news

रायपूरहून नागपूर व अमरावतीमार्गे सूरतला जाणाऱ्या बसने वाटेतच अचानक पेट घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस पोलीस ठाण्याजवळ नेत सर्व प्रवाशांच्या खाली उतरवले. यामुळे पुढील अनर्थ टाळण्यात आला.

पेटलेली बस
पेटलेली बस

By

Published : Nov 30, 2020, 5:23 AM IST

Updated : Nov 30, 2020, 6:59 AM IST

अमरावती -रायपूरकडून सुरतच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस ठाण्यासमोर घडली घडली. सुदैवाने बस चालकाच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला. बसमधील सर्व 52 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

पेटलेली बस

घटनेची माहिती मिळतात तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला बोलविण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन बंब, पोलीस प्रशासन व नागरिकाच्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, आग इतकी भीषण होती की ही बस पूर्णपणे जळाली आहे. महामार्गावर बसला लागलेल्या या आगीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती.

रायपूरवरून सुरतच्या दिशेने जात होती बस

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महेंद्र ट्रॅव्हल्स (सी जी 19 एफ 0231) बस रायपूरहून प्रवासी घेवून नागपूर, अमरावतीमार्गे सुरतकडे निघाली होती. दरम्यान, नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पोलीस ठाण्याच्या समोर अचानक या बसने पेट घेतला.

सर्व प्रवासी होते गाढ झोपेत

बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक बसमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच बसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा तत्काळ तिवसा पोलीस ठाण्याचे कर्मचारी निलेश खंडारे यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केले. त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता.

टायर फूटल्याने आग लागल्याचा अंदाज

बसच्या डाव्याबाजूचा मागील टायर फुटल्याने धावत्या बसने पेट घेतल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा -अमरावतीत दिड महिन्याच्या बाळाचे अपहरण

Last Updated : Nov 30, 2020, 6:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details