अमरावती -तूफक्त माझ्या पैशाचा, मनाचा वापर केला आहे.आता मला न्याय हवा आहे. प्रेयसीने दुसऱ्या मुलाशी साखरपुडा केल्याने अमरावती जवळच्या रहाटगाव येथील एका तरुणाने नैराश्येत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून व्हिडिओही बनवला आहे, त्यानुसार आत्महत्येस प्रेयसीच जबाबदार असल्याचे त्याने नमूद केले आहे.
अनुभव धाकडे (वय 33 वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर नगर, अमरावती), असे मृत तरुणाचे नाव आहे. अनुभव धाकडेचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत चार ते पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. नेहमी हे दोघे रहाटगाव नजीक असलेला या शेताजवळ भेटत होते. ते लग्नही करणार होते. मात्र, अचानक प्रेयसीने साखरपुडा केल्याची माहिती या युवकाला झाली. त्यामुळे त्याने ज्या झाडाखाली हे तो रोज भेटायचे त्याच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी माझ्या आत्महत्येला माझी प्रेयसी जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून ठेवली आहे.
काय म्हणतात पोलीस प्रशासन