अमरावती -केंद्र सरकारने वाढवलेल्या खतांच्या किंमतीत वाढ व तूर आयातीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अमरावतीच्या राजकमल चौकात 'थाळी बजाओ' आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारचे तूर आयातीचे धोरण चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी केली.
हे शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव पाडण्याचे षडयंत्र -
केंद्र सरकारचे धोरण हे नेहमी शेतकरीविरोधी राहिलेले आहे. यावर्षी जवळपास ३८ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आधीच ८ ते ९ लाख टन आपली तूर शिलक असताना पुन्हा केंद्र सरकार ९ लाख टन तूर आयात करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग, तूर, उळीड, हरबरा आदी पिकांचे भाव पाडण्याचे षडयंत्र केंद्र सरकारतर्फे सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.