अमरावतीAttack on MLA Ravi Rana-आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आज अंजनगाव सुर्जी येथील टाकरखेडा नाका येथे दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दहीहंडीचा सोहळा आटोपल्यावर आमदार रवी राणा हे अमरावतीला परत येत होते. अंजनगाव सुर्जी तालुक्याचे शिवसेना ( ठाकरे गट) पदाधिकारी महेंद्र दिपटे यांनी आमदार रवी राणा यांची गाडी अग्रसेन चौक परिसरात अडवली. गाडी थांबताच आमदार रवी राणा हे गाडी बाहेर आले.
Attack on MLA Ravi Rana : आमदार रवी राणांवर हात उगारणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला चोप, पोलिसांनी केली कशीबशी सुटका - आमदार रवी राणा
Attack on MLA Ravi Rana बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या वाहनाचा ताफा अडवून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उलट-सुलट का बोलता? असा प्रश्न विचारत एका शिवसैनिकानं ( ठाकरे गट) थेट आमदार रवी राणा यांच्यावर हात उगारल्यामुळे अंजनगाव सुर्जीत खळबळ उडाली. आमदार रवी राणा यांच्यावर चालून येणाऱ्या या शिवसैनिकाला आमदार राणांच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यामुळे अंजनगाव सुर्जी तणाव निर्माण झाला.
Published : Sep 11, 2023, 10:18 PM IST
महेंद्र दिपटे यांनी आमदार रवी राणा यांच्या जवळ जाऊन उद्धव ठाकरे विरोधात का बोलता, असा जाब विचारत मारहाण केली. हा प्रकार घडताच आमदार रवी राणा यांच्यासह असणाऱ्या वाहनाच्या ताब्यातील कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांना मारहाण करणाऱ्या महेंद्र दिपटे यांना चोप दिला. दरम्यान पोलिसांनी धाव घेऊन राणांच्या कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या महेंद्र दिपटे यांना कसेबसे सोडवले. त्यांना पोलीस ठाण्यात नेले.
- तणाव कायम -या घटनेमुळे अंजनगाव सुरजी येथील नवीन बस स्थानक लगत असणाऱ्या अग्रसेन चौक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अनेक शिवसैनिकदेखील चौकात धावून आलेत. दरम्यान पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जमावाला पांगविले. अंजनगाव सुर्जी येथे घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिवसैनिक चाकू घेऊन धावल्याचा राणा समर्थकांचा मेसेज वायरल या घटनेनंतर आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला आहे. यात म्हटले की, अंजनगाव सुर्जी येथे आठ ते दहा शिवसैनिक चाकू घेऊन आमदार रवी राणा यांच्या दिशेने धावले . मात्र या घटनेत आमदार रवी राणा सुखरूप बचावले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका-अंजनगाव सुर्जी येथे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे महेंद्र दिवटे यांच्या वाद झाला. यानंतर तणाव निर्माण झाला होता. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र आता आमदार रवी राणांवर चाकू हल्ला वगैरे झाल्याची अफवा पसरविली जात आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवू नका, असे अंजनगाव सुर्जीचे पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले आहे.