महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीमध्ये वाघाची दहशत, काळविटाला केले फस्त - Amravati latest news

या परिसरात वनविभागाची टीम दाखल झाली असून हिंसक प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावला आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने वनविभाकडून शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अमरावतीमध्ये वाघाची दहशत

By

Published : Nov 13, 2019, 10:24 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील पथ्रोड सिंदी परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच याच परिसरात रानडुक्कराची वाघाने शिकार केल्यानंतर आता काळविटाची शिकार झाल्याने परिसरातील शेतकरी घाबरून शेतात जाणे टाळत आहे.

अमरावतीमध्ये वाघाची दहशत

हेही वाचा - विदर्भाची पंढरी कौंडण्यपुरात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडला दहीहंडी सोहळा

तर वनविभागाला ही शिकार वाघाने केली की बिबट्याने हा संभ्रम कायम आहे. या परिसरात वनविभागाची टीम दाखल झाली असून हिंसक प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावला आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने वनविभाकडून शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केले पीक, सत्ता स्थापनेच्या घोळात शेतकरी वाऱ्यावरच

ABOUT THE AUTHOR

...view details