अमरावती - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार नसून, एप्रिल-मेमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम देखील कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या अमरावतीत पत्रकारांशी बोलत होत्या.
दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये - वर्षा गायकवाड
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार नसून, एप्रिल-मेमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम देखील कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये
शाळेत सध्या 3 लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात अद्यापही शाळा बंदच आहेत. राज्यभरात सध्या 3 लाखांच्या आसपास विद्यार्थी शाळेत येत असल्याचेही त्यांनी सांगितले. गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे तीन महत्त्वाचे विषय आहेत, ते शिकवण्यासाठी शाळा सुरू करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.