अमरावती- अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी 10 जण दगावले आहेत. कोरोनामुळे अमरावतीत आतापर्यंत एकूण 80 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासन अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे वास्तव आहे.
बुधवारी दिवसभरात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावती शहरातील नमुना गल्ली येथीक 75 वर्षीय महिला आणि 58 वर्षीय पुरुष फ्रेझरपुरा परिसरातील 55 वर्षीय पुरुष, विद्याभारती महाविद्यालय परिसरात असणाऱ्या ईश्वर अपार्टमेंट येथील रहिवासी असणारा 61 वर्षीय पुरुष, किरण नगर येथील 58 वर्षीय पुरुष, यशोदानगर येथील 49 वर्षाची महिला, कॅम्प परिसरातील 79 वर्षीय महिला, गोपालनगर येथील 72 वर्षीय पुरुष मोर्शी शहरातील 50 वर्षीय पुरुष पुरुष कोरोनामुळे दगावले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 80 वर पोहोचली आहे.