महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या - Amravati cold 5.5 temperature

मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान १७ ते १४.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम नागरिकांना जाणवला नाही. मात्र, अचानक तापमान ३.५ अंशांनी घटल्यामुळे नागरिकांना थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे.

amravati
शेकोटी पेटवून ऊब घेताना नागरिक

By

Published : Dec 8, 2019, 1:03 PM IST

अमरावती- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढला आहे. तापमान अचानक घटल्याने नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ग्रामिण भागातील लोक शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे रक्षण करीत आहे. पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

शेकोटी पेटवून ऊब घेताना नागरिक

मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमान १७ ते १४.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम नागरिकांना जाणवला नाही. मात्र, अचानक तापमान ३.५ अंशांनी घटल्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. सकाळच्या वेळी धुके पडले असून थंडीचा जोर कायम आहे. तर थंडीमुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांकडून गप्पांचा फंड रंगवतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर, थंडीमुळे रब्बी पिकालासुद्धा चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

कन्याकुमारी मालदीव पट्ट्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येमेन किनारपट्टीवर पवन नामक वादळ सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवेच्या दिशेत सकारात्मक बदल झाले आहे. त्यामुळे शहरात पूर्वेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली असून यामुळे वारे उत्तरेकडून वाहायला सुरुवात झाली आहे. पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हेही वाचा-..तरीही वरूड तालुक्यात 0 टक्के नुकसान; कृषी विभागाचा धक्कादायक अहवाल

ABOUT THE AUTHOR

...view details