महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : अंजनगाव सुर्जीच्या जय गुरुदेव आश्रमास तहसीलदारांची भेट, कार्यकर्त्यांची केली चौकशी - विश्वनाथ घुगे

अंजनगाव तालुक्यातील सातेगाव रोडवरील जय गुरुदेव आश्रमास तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी भेट दिली. लॉकडाऊन काळामध्ये गेल्या दीड महिन्यापासून जय गुरुदेव आश्रमामार्फत रोज गरजूंना जेवणाचे डबे दिले जातात, अजूनही त्यांची सेवा सुरू आहे.

अंजनगाव सुर्जीच्या जय गुरुदेव आश्रमास तहसीलदारांची भेट
अंजनगाव सुर्जीच्या जय गुरुदेव आश्रमास तहसीलदारांची भेट

By

Published : May 11, 2020, 10:58 AM IST

अमरावती - अंजनगाव तालुक्यातील सातेगाव रोडवरील जय गुरुदेव आश्रमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज गरजूंना डबे दिले जातात. त्यांच्या या कार्याचा आढावा घेण्यासाठी अंजनागाव सुर्जीचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी आश्रमाला भेट दिली, आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी अंजनगाव सातेगाव रोडवरील जय गुरुदेव आश्रमास भेट देऊन त्यांच्या सुरू असलेल्या या कार्याची दखल घेतली. आश्रमातील सर्व कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी केली. या संचारबंदीच्या काळामध्येही जय गुरुदेव आश्रम गोरगरीब गरजू लोकांना गेल्या दीड महिन्यापासून आश्रमामार्फत रोज जेवणाचे डबे पोहचवत असून त्यांची ही सेवा सतत सुरू आहे. तसहीलदार घुगे यांनी आश्रमातील कार्यकर्ते जी सेवा देत आहे, त्यांच्या कार्याचे कौतुक केले. आपण देत असलेली निस्वार्थ सेवा ही फार मोठी आहे. हे कार्य अनमोल असून माझ्या आयुष्यात आपल्या या कार्याची सदैव आठवण राहील, या शब्दात तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी संजय रोहणकर, प्रा. देवानंद महल्ले, विवेक शिंगाने, मनोहर रोहनकर, ठाकरे गुरुजी, रमेश शेळके, राजू रोहनकर, विनायकराव बांडे, रघुनाथराव शिंदे, क्षितिज रोहनकर, विनायकराव इंगळे, जानरावजी पाखरे, अंकित तायडे, भगीरथ टावरी, सुनील ठाकरे, प्रमोद सिंगनजुळे, लालजी सिंघनजुळे आदी मंडळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details