महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : अमरावतीच्या तहसीलदारांचा पंढरपुरात टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका

रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावतीच्या कौंडण्यपूरयेथील पालखी काल पंढरपुरात दाखल झाली. यावेळी तिवस्याचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी अधिकारी असल्याचा बडेजाव न ठेवता ते सामान्य वारकऱ्याप्रमाणे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले.

ashadhi wari
अमरावतीच्या तहसिलदाराचा पंढरपुरात ताळ-मृदंगाच्या तालावर ठेका

By

Published : Jul 20, 2021, 5:12 PM IST

Updated : Aug 17, 2021, 3:43 PM IST

अमरावती - रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावतीच्या कौंडण्यपूरयेथील पालखी काल पंढरपुरात दाखल झाली. या पालखीमध्ये 40 वारकऱ्यांचा समावेश आहे. तिवस्याचे तहसीलदार वैभव फरतारेदेखील वारकऱ्यांचा समवेत पंढरपूरमध्ये आहे. दरम्यान, अधिकारी असल्याचा बडेजाव न ठेवता ते सामान्य वारकऱ्याप्रमाणे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले. आज सकाळी पालखीतील वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून भक्तीरसात ते दंग झाले होते. चक्क अधिकाऱ्यांनीच ठेका धरल्याने वारकऱ्यांचाही उत्साह वाढला होता. कोरोनाकाळात दुसऱ्यांदा मला वारकऱ्यांसोबत पंढरपुरता येण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया वैभव फरतारे यांनी दिली.

व्हिडीओ
Last Updated : Aug 17, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details