अमरावती- जिल्ह्यातील वरुड तहसीलासरांच्या गाडीवर चालक असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. या महिलेला ताप, सर्दी, खोकला असल्याने तिला तीन दिवसांपूर्वी वरुड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या महिलेला पुढील उपचारासाठी नागापुरला पाठविले होते. आज नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तिचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे वरुड शहरातील तिच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या पत्नीला कोरोना; वरुड शहरात खळबळ - अमरावती कोरोना व्हायरस बातमी
जिल्ह्यातील वरुड तहसीलासरांच्या गाडीवर चालक असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. या महिलेला ताप, सर्दी, खोकला असल्याने तिला तीन दिवसांपूर्वी वरुड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
tehsildar-drivers-wife-tested-corona-positive-in-amravati