अमरावती - निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर केली असून 1 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
5 नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 12 नोव्हेंबरपर्यंत 10 हजार रुपयांच्या अनामत रकमेसाह नामनिर्देशन पत्र विभागीय आयुक्तालयात दाखल करावे लागणार आहे. 13 नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून उमेदवारांना 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 1 डिसेंबरला सकळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी करून निकाल घोषित होणार आहे. 7 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
मतदारांची जिल्हा निहाय संख्या
पुरुष / महिला / इतर / एकूण
अमरावती - 6793 / 3295 / 00 / 10088
अकोला - 4099 / 1901 / 01 / 6000
वाशिम - 3145 / 627 / 00 / 3773
बुलडाणा - 5927 / 1495 / 00 / 7422
यवतमाळ - 5614 / 1793 / 00 / 7507