अमरावती - काम न करता पगार घेणारे शिक्षक देशद्रोही आहेत, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदनदेखील सादर करण्यात आले आहे.
शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या नामदेव जाधव यांच्याविरोधात शिक्षक सेना आक्रमक
पुणे येथील नामदेव जाधव यांनी एका कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही संबोधून काम न करता पगार उचलतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
पुणे येथील नामदेव जाधव यांनी एका कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही संबोधून काम न करता पगार उचलतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाले असून प्रा. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अमरावतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष रुपेश टाले यांच्या नेतृत्वात नामदेव जाधव यांचा निषेध नोंदविण्यात आला. जाधव यांच्या बेताल वक्तव्याने शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.