अमरावती - अंजनगाव सुर्जी-अचलपूर तालुक्यातील पथरोट जयसिंग विद्यालयातील संजय श्रीराम नागे (वय ५३) या शिक्षकास शाळेतील मुलींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक केली आहे.
शाळेमध्ये शिकवताना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हा शिक्षक अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करायचा, मुलींना चुकीच्या पद्धतीने शारीरिक स्पर्श करणे, विरोध केल्यास मुलींना मारहाण करायचा. याबाबत एका पीडित मुलीने शाळांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्यावतीने लावलेल्या तक्रार पेटीमध्ये तक्रार दिली.
विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करणारा शिक्षक गजाआड हेही वाचा -तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, कामात दिरंगाई करणारा ठेकेदार टाकला काळ्या यादीत
पीडितेच्या तक्रारीची दखल अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. हरी बालाजी एन. यांनी घेऊन तातडीने ग्रामीण महिला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे एक पथक पथरोट येथे रवाना केले. त्या शाळेतील पीडित मुलीचा शोधून घेऊन तपास सुरू केला. पीडित मुलीच्या जबाबावरून जयसिंग विद्यालयातील शिक्षक संजय श्रीराम नागे याला आज (दि. २८) ताब्यात घेतले.
हेही वाचा -सुप्रिया सुळे झाल्या वृत्त निवेदिका; उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिली बातमी
या शिक्षकाविरुद्ध पीडित मुलीच्या विनयभंगाप्रकरणी तसेच अनुसूचित जाती जमाती, अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भादवि ३५४, ३५४ (अ) ३ (१) (डब्ल्यू) (आय) (दोन) अन्वये पथोरट पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सदर शिक्षकास अटक करण्यात आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्येही कडेकोट पोलीस बंदोबस्त
पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. हरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून दोन महिन्यापूर्वी शाळा कॉलेज व महत्त्वाच्या ठिकाणी तक्रार पेट्या बसवण्यात आल्या होत्या. या तक्रारपेटीमुळे पीडित मुलीला आपल्याविरुद्ध होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रार करण्याकरिता चालना मिळाल्याने या पीडित मुलींनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार शाळेत बसविलेल्या तक्रार पेटीमध्ये केल्याने या पिडीत मुलीच्या तक्रारीला वाचा फुटली व या तक्रारीची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेऊन संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई केली.
पीडित मुलीच्या प्रकरणाचा तपास अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.