महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या उच्चशिक्षित पाणीपुरी वाल्याची चवदार पाणीपुरी - अमरावती पाणीपुरी स्पेशल स्टोरी

अमरावतीमध्ये प्रथमच ब्रँडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉन्च करण्यात आली आहे. 'युअर हेल्थ इज अवर वेल्थ' म्हणजेच तुमचे आरोग्य हीच आमची संपत्ती या टॅगलाईन अंतर्गत लोकांना ही सेवा दिली जाणार आहे.

अमरावतीच्या उच्चशिक्षित पाणीपुरी वाल्याची चवदार पाणीपुरी
अमरावतीच्या उच्चशिक्षित पाणीपुरी वाल्याची चवदार पाणीपुरी

By

Published : Feb 15, 2021, 9:00 PM IST

अमरावती -विदर्भाच्या खवय्येगीरीला तोड नाही असे म्हणतात. अमरावती शहरात फास्टफूड गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात खवय्यांचे सुद्धा वेगवेगळे क्लास आहेत म्हणूनच खवय्येगिरीतील विविध लोकांच्या इच्छापुर्तीसाठी अमरावतीमध्ये प्रथमच ब्रँडेड ‘सफल’ हायजिनिक पाणीपुरी लॉन्च करण्यात आली आहे. 'युअर हेल्थ इज अवर वेल्थ' म्हणजेच तुमचे आरोग्य हीच आमची संपत्ती या टॅगलाईन अंतर्गत लोकांना ही सेवा दिली जाणार आहे. ऑटोमॅटिक पाणीपुरी मशीनद्वारा खवय्यांना सात वेगवेगळ्या चवीमध्ये ही पाणीपुरी चाखायला मिळणार आहे. ही पाणीपुरी लॉन्च करणारा तरुण एमबीए आणि नोकरीचाही अनुभव असलेला आहे. एका शेतकरी पुत्राने हा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू केला आहे. अक्षय होले असे या तरुणाचे नाव असून अमरावतीच्या साईनगरजवळ त्याने सफल या नावाने ब्रँडेड पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे. 40 रुपयात सात फ्लेवरचे पाणी असलेली पाणीपुरी दिली जाते. अशा प्रकारची पाणीपुरी विदर्भात केवळ आपल्याकडेच मिळत असल्याचा दावा अक्षयने केला आहे.

अमरावतीच्या उच्चशिक्षित पाणीपुरी वाल्याची चवदार पाणीपुरी
पाणीपुरी किंवा इतर फास्टफूडच्या व्यवसाय म्हटले कि नॉर्थ इंडियन किंवा साउथ इंडियन व्यक्ती डोळ्यासमोर येतो. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा या गावातील शेतकरी कुटुंबातील अक्षय होले याने बीएससी कम्प्युटर व एमबीए शिक्षण घेऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. वर्षभर विविध व्यवसायांचा अभ्यास करून खाद्य पदार्थांचा व्यवसाय टाकण्याचा निर्धार केला. शोध व संशोधनातून सुरुवातगेल्या पाच वर्षांपासून अक्षय त्याच्या मामाकडे अमरावतीत शिक्षण घेत होता. याच काळात बडनेरा ते राजकमल चौकपर्यंत अशी एकही गाडी नव्हती जिथे अक्षयने पाणीपुरी खाल्लेली नाही किंवा तो गाडीवाला अक्षयला ग्राहक म्हणून ओळखत नाही. त्याची हीच आवड त्याचा व्यवसाय बनेल याची कल्पना अक्षयला सुद्धा नव्हती. पण जेव्हा व्यवसाय करायचे पक्के झाले. तेव्हा गुगल व यूट्यूब वर विविध व्यवसायाचा त्याने अभ्यास केला. त्या आधारे पाणीपुरीचा व्यवसाय टाकण्याचे निश्चित केले. केवळ एखादी गाडी घेऊन व्यवसाय टाकण्यापेक्षा सर्वच स्तरातील खवय्यांची तृष्णातृप्ती पूर्ण व्हावी म्हणून क्वांटीटी सोबत क्वालिटीवरही भर देण्याचा त्याचा मानस होता. अमरावती व इतर शहरातील या व्यावसायिकांची भेट घेत त्याने सखोल अभ्यास केला. त्यानंतर अहमदाबाद (गुजरात) येथे जाऊन तब्बल सहा महिने या व्यवसायाचा शॉर्ट टर्म अभ्यासक्रम पूर्ण केला. केवळ एकाच चवीचा आधार न घेता ग्राहकांना विविध चवी कशा देता देईल याचा अभ्यास करण्यात आला.
उच्चशिक्षित पाणीपुरी वाल्याची चवदार पाणीपुरी
चाळीस रुपयात अनलिमिटेड पाणीपुरीपाणीपूरी म्हटले कि केवळ एका प्लेटमध्ये कोणाचेच समाधान होत नाही. अमरावतीमध्ये चांगली पाणीपुरी 15 ते 20 रुपयात केवळ सहा नग मिळतात. पण ग्राहकांनी एकदा ‘सफल’ पाणीपुरीची चव घेतल्यावर त्यांचे समाधान व्हावे म्हणून एका व्यक्तीला केवळ 40 रुपयात अनलिमिटेड पाणीपुरी मिळत आहे. शिवाय पुदिना, खट्टा मिठा, जलजीरा, चायनिज, टोमटो, लसून, अद्रक निंबू आदी सात विविध फ्लेवर सह चॉकलेट, पिझ्झा, फायर, भेल, शेव, दही पाणीपुरी सह स्वतंत्र भेळीची ही चव चाखायला मिळत आहे.जिल्ह्यात सर्वत्र घरपोच पुरवठा

स्वादिष्ट पाण्याच्या मशीन सह पुरी बनवण्याची मशीन उपलब्ध असल्याने तो अमरावती, बडनेरा, चांदूर रेल्वे सह इतर भागातही पुरीची मागणी वाढत आहे. केवळ 45 रुपयांमध्ये 100 नग उपलब्ध होत असल्याने अनेक पाणीपुरी विक्रेते अक्षयकडे पुरीची मागणी करत आहे. एका तासात तब्बल 6 हजार एकसारख्या पुरी तयार होत असल्याने अक्षयचा भाऊ प्रतीकसुद्धा त्याला या कार्यात मदत करत आहे. मोठी ऑर्डर असल्यास घरपोच पुरी सुद्धा पोहचवण्याची व्यवस्था प्रतीक सांभाळत आहे.

पाणीपुरीसह मनोरंजन
सात वेगवेगळ्या स्वादिष्ट चवींचा आनंद घेताना तुमच्या मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था ‘सफल’ ने केली आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने पाणीपुरी खाताना तुमचे मनोरंजन व्हावे म्हणून दोन्ही बाजूने दोन रंगीत टीव्हीची व्यवस्था केली आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक ग्राहकाची तब्येतीची काळजी घेत ऑटोमेटिक स्वरुपात तुम्हाला स्वतः गोलगप्यांमध्ये आवडता फ्लेवर चाखायला मिळणार आहे. शिवाय हॅंडवॉश सह बेसिनची व्यवस्था सुद्धा इथे केली असल्याने तुमच्या स्वास्थ्याची अधिक काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच नवसारी, पोटे इस्टेटपासून ते बडनेरामधील लोकांची गर्दी होत आहे.

हेही वाचा -जळगाव : किनगाव अपघात प्रकरणी ट्रकचालकासह व्यापाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; दोघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details