अमरावती -1932 मध्ये सुरु केलेल्या मसाला दुधाची ( Masala milk ) चव आज 90 वर्षांनंतर चौथ्या पिढीने जतन केली आहे. बदल झाला आहे पण फक्त किमतीत. काही प्रदेशात उपलब्ध मसाला दूध, मिठाईच्या किमतीत वाढ ( Increase in price of masala milk sweets ) झाली असली तरी चव, मात्र तीच आहे. अमरावतीतील मसला दुधाच्या ( Masala Milk Sweets ) हलवाईचे वारसदार असलेले वारसदार असलेले गोपालचंद वारिया यांनी सांगितले की, आज या व्यवसायात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे.
गरम मसाला दूध कुठे मिळेल?शहरातील जवाहर रोडवरील जवाहर गेटच्या आतमध्ये पुनमचंद ओ. हलवाई या नावाने मसाला दूधाचे दुकान आहे. तसेच विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ इथे अमरावतीकरांना चाखायला ( Increase in price of masala milk ) मिळतात. या दुकानांमध्ये ग्राहकांच्या पसंतीस पडणारे सर्वात जास्त काय असेल तर, ते म्हणजे मसाला दूध. सायंकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी एका मोठ्या कढईमध्ये हे दूध ओतले जाते. त्यामध्ये ते दूध घोटून मलाई युक्त दूध ग्राहकांना पिण्यास दिले जाते. तेही विशिष्ट प्रकारच्या धातूच्या ग्लासमध्ये. सायंकाळ झाली की शहरातील खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. नवरात्र उत्सवाच्या काळात या ठिकाणी ग्राहकांची प्रचंड झुंबड असते.
पुनमचंद हलवाईंच्या दुकानात काय मिळते?मसाला दूध, गुलाब जामुन, कलाकंद, पेठा, पेढा, मलाई पेढा ,केसरी पेढा, मिल्क केक, मैसूर पाक, बालुशाही असे विविध प्रकारचे उत्पादन या ठिकाणी मिळतात. खासदार आमदारांसह बड्या बड्या सेलिब्रिटींनीसुद्धा या ठिकाणी भेट देऊन आपल्या पदार्थांची चव चाखल्याची येथील हलवाई गोपालचंद वारिया सांगतात. आमचे आजोबा शहरात आले. त्यांनी मोठ्या मेहनतीने हा धंदा उभारला. त्यानंतर आम्ही सुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी मदत केली. त्यामुळेच आज चौथी पिढी या व्यवसायात कायम असल्याचे गोपालचंद वारिया यांनी सांगितले.